Ad will apear here
Next
मच्छिमारांना मिळणार नुकसानभरपाई
समुद्रातील दुर्मिळ प्रजातींच्या संरक्षणासाठी जाळे फाडल्यास देणार अनुदान
मुंबई : ‘मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती अडकल्यास मासेमारी जाळे फाडून किंवा कापून त्या प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे, असे करताना मच्छिमारांना मासेमारी जाळ्याच्या नुकसानभरपाईपोटी २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयामुळे समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण होणार आहे.

समुद्रात कासव, डॉल्फिन, शार्क आणि इतर दुर्मिळ प्रजाती आढळतात. त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. मासेमारी करताना अनेकदा अशा प्रजाती मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकतात, त्यांना सोडविण्यासाठी मच्छिमारसुद्धा प्रयत्न करतात; परंतु असे करताना मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान होते. त्यामुळे काही वेळेस मच्छिमार अशा प्रजाती पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण व्हावे आणि त्यांची सुटका करताना मासेमारी जाळे फाटल्याने किंवा कापल्याने मच्छिमार बांधवांचे होणारे नुकसानही टाळता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘महान्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे.

मुनगंटीवार म्हणाले, ‘हे अनुदान मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग यांच्या कांदळवन कक्षामार्फत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल. असे नुकसानभरपाई अनुदान मागताना मच्छिमारांनी नौका मालकाचे नाव, पूर्ण पत्त्यासह अनुदानाचा अर्ज, नौकेचे नाव व क्रमांक, मासेमारी परवाना, नौका नोंदणी प्रमाणपत्र, नौकेवर उपस्थित सर्व सदस्यांची नावे आणि आवश्यक कागदपत्रे, ज्या ठिकाणी दुर्मिळ प्रजाती सापडल्या आहेत त्या ठिकाणचे जीपीएस क्रमांक, जाळी फाडताना व दुर्मिळ प्रजातींची सुटका करतानाचे छायाचित्र व चित्रफीत सादर करणे आवश्यक आहे.’

समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छिमारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या अखत्यारितील कांदळवन कक्षामार्फत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या स्तरावर दोन महिन्यांनी मच्छिमार सहकारी संस्थेत जाऊन प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी लागणारा प्रशिक्षणाचा खर्च ही कांदळवन कक्षामार्फत करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘समुद्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करण्याबाबत मच्छिमारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाने निर्गमित केला आहे,’ असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZKKBV
Similar Posts
पर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा निर्धार मुंबई : देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर विजयी झालेल्या काही खासदारांनी पुढाकार घेत आपल्या मतदारसंघात ‘जेवढी मते तेवढी झाडे’ लावण्याचा अनोखा निर्धार जाहीर करत पर्यावरण रक्षणाप्रती आपली कटिबद्धता जाहीर केली. या सर्व खासदारांचे अभिनंदन करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व
स्वच्छ कांदळवन अभियानाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद मुंबई : राज्य सरकारच्या वन विभागातर्फे लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या स्वच्छ कांदळवन अभियानाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. २०१५मध्ये कांदळवन कक्षाने सुरू केलेल्या स्वच्छ कांदळवन अभियानामध्ये मुंबई आणि परिसरातील ११.०३ किलोमीटर समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील आठ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले
‘देशाच्या गौरवात भर टाकण्याचे काम राम सुतार यांनी केले’ मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे भारताचे कोहिनूर असून, आमच्याकडे असलेला हा ‘कोहिनूर’ अनमोल आहे. त्यांनी आपल्या कलेतून भारत देशाच्या गौरवात भर टाकण्याचे काम सातत्याने केले आहे,’ असे गौरवोद्गार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
रिक्षाचालक प्रकाश माने बनले वृक्षलागवडीचे प्रेरणादूत मुंबई : उपजीविकेसाठी प्रत्येक जणच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय-नोकरी करतो मात्र उपजीविकेच्या साधनाला सामाजिक जाणिवेची जोड देणारे फारच कमी असतात. दहिसर येथील रिक्षाचालक प्रकाश माने हे त्यातलेच एक आहेत. त्यांनी आपल्या रिक्षाला वेगवेगळी १० रोपे लावून अनोख्या पद्धतीने सजविले असून, या माध्यमातून ते वृक्ष लागवडीचा संदेशही देत आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language